इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरी कसोटी, बर्मिंगहॅम (जुलै ०२-०६, २०२५): संपूर्ण सामन्याचा सारांश, स्कोअर, शुभमन गिलचे रेकॉर्ड आणि विजयाची शक्यता.
England vs India, 2nd Test, Birmingham (July 02-06, 2025): Full match summary, score, Shubman Gill’s record and Winning Chances.
Written by : K. B.
Updated : जुलै 7, 2025 | 10: 51 AM
भारताने पहिल्या कसोटी पराभवानंतर २ जुलै २०२५ च्या इंग्लंड दौऱ्यातील एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीने क्रिकेट जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. विक्रमी कामगिरी आणि भारताच्या प्रभावी प्रदर्शनामुळे, हा सामना अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये एक निर्णायक अध्याय बनला आहे. त्याचा आढावा आपण वाचूया.
कसोटीचा सारांश: इंग्लंड विरुद्ध भारत, लीड्स येथे दुसरी कसोटी
- स्थळ: एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
- तारीख: ०२-०६ जुलै, २०२५
- नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला
- भारताचा पहिला डाव: ५८७ धावांवर सर्वबाद
- इंग्लंडचा पहिला डाव : ४०७ धावांवर सर्वबाद
- भारताचा दुसरा डाव: ४२७/६ घोषित
- इंग्लंडचा दुसरा डाव : ७२ धावांवर ३ बाद
- इंग्लंडसाठी लक्ष्य: ६०८ धावा
- सामन्याची स्थिती: ९० ओव्हर्स मध्ये इंग्लंड ला ५३६ धावा गरज आहे.
Team | 1st Innings | 2nd Innings | Total Lead |
India | 587 | 427/6 declared | 607 |
England | 407 | 72/3 (16 overs) | England need 536 runs. |
कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत दुसऱ्या कसोटीत सुरुवातीपासूनच प्रभावी दिसत होता. पहिल्या डावात ५८७ धावांची मोठी खेळी केल्यानंतर, यशस्वी जैसवाल ८७ (१०७), रवींद्र जडेजा ८९ (१३७) आणि शुभमन गिलच्या २६९ (३८७) द्विशतकाच्या जोरावर त्यांनी ५८७ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात के एल राहुल ५५ (८४), रिषभ पंत ६५ (५८), रवींद्र जडेजा ६९ (११८), शुभमन गिलच्या १६१ (१६२) शतकाच्या जोरावर सहा बाद ४२७ धावा करून डाव डिक्लेर केला. इंग्लंडला ६०८ धावांचे टार्गेट दिले.
इंग्लंडचा प्रतिसाद भयानक होता. पहिल्या डावात जेमी स्मिथ १८४ (२०७) आणि हॅरी ब्रूक १५८ (२३४) यांनी ३४२ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात मोहम्मद सिराज ६ विकेट आणि आकाश दीप ने ४ विकेट घेत दोघांनी इंग्लंड ला ४०७ वर सर्वबाद केले. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दुसऱ्या डावात इंग्लंडने ३ बाद ७२ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ऑली पोप २४ धावा आणि हॅरी ब्रूक १५ खेळत आहेत.
शुभमन गिलचे एकाच कसोटीत डबल शतक आणि शतक:
भारताचा माजी कर्णधार शुभमन गिलने एका पिढीची कारकीर्द घडवली आहे. ३११ चेंडूत २०० धावा पूर्ण करत आपल्या अंदाजाने जल्लोष केला. त्याने पहिल्या डावात ३९ चौकार आणि ३ षटकारात ६९.५१ सरासरीने ३८७ चेंडूत २६९ धावा केल्या. शुभमन गिल ने बी. टँग च्या चेंडू मारला आणि सी. पोप ने कॅच घेतला. १२९ चेंडूत १०० धावा पूर्ण करत आपल्या अंदाजाने जल्लोष केला. त्याने दुसऱ्या डावात १३ चौकार आणि ८ षटकारात ९९.३८ सरासरीने १६२ चेंडूत १६१ धावा वेगाने केल्या. वन डे सारखा खेळात होता. शोएब बशीर ने त्याला बाद केले आणि शुभमन १६१ धावावर बाद झाला.
शुभमन गिल ने विक्रम मोडले:
कसोटी इतिहासात शुभमन गिल चे एकाच सामन्यात २५०+ आणि १५०+ धावा करणारा पहिला खेळाडू बनला. आणि सुनील गावस्करनंतर एकाच सामन्यात दोन शतके आणि एक शतक करणारा दुसरा भारतीय बनला. एका भारतीयाने एका कसोटी एकाच सामन्यात सर्वोच्च धावसंख्या (४३० धावा) केल्या आहेत. विराट कोहलीचा २५४* धावांचा विक्रम भारतीय कसोटी कर्णधाराने आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. गिलच्या नेतृत्वाने आणि फलंदाजीने परदेशात उत्तम खेळपट्टी केली आहे आणि कसोटी उत्कृष्टतेसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.

जिंकण्याची शकता: स्पर्धा कोण जिंकेल?
भारताचा ८५% प्रतिशत जिकंण्याचा चान्स आहे. जर हवामान अंदाज वर १४% प्रतिशत ड्रॉ होऊ शकते. इंग्लंडसाठी विजयाची शक्यता १% च आहे. भारताचे गोलंदाज, विशेषतः सिराज आणि आकाश दीप, विसंगत आहेत आणि खेळपट्ट्या बिघडण्याची चिन्हे दाखवू लागल्या आहेत. जर इंग्लंडने जोरदार खेळी केली नाही तर भारत मालिका १-१ अशी बरोबरी करण्याच्या जवळ आहे.
सामन्यातील अधिक अपडेट्स, खेळाडूंचे हायलाइट्स आणि सामन्यानंतरच्या विश्लेषणासाठी आमच्याशी संपर्कात रहा.