जागतिक कसोटी इतिहासात एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारे फलंदाज
Batsmen who have scored a Double Century and a Century in the same Test match in World Test History
Written by : K. B.
Updated : जुलै 7, 2025 | 05: 45 PM
जगातील कसोटी इतिहासात फक्त नऊ खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे ज्यांनी एकाच कसोटीत २००+ आणि १००+ धावा केल्या आहेत असे खेळाडू पाहू:
इंग्लंडचे ग्राहम गूच यांनी पहिल्या डावात ३३३ आणि दुसऱ्या डावात १२३ धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक वयक्तिक ४५६ धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम ग्रॅहम गूचच्या नावावर आहे. श्रीलंके चे कुमार संगकारा यांनी पहिल्या डावात ३१९ धावा केल्या होत्या आणि त्यांच्या दुसऱ्या डावात १०५ धावा केल्या आहेत. कसोटी इतिहासात श्रीलंके चे कुमार संगकारा आणि इंग्लंडचे ग्राहम गूच हे एकमेव दोन खेळाडू आहेत ज्यांनी एकाच कसोटी सामन्यात त्रिशतक + शतक केले आहे.
वेस्ट इंडिज चे लॉरेन्स रो पहिल्या डावात २१४ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात १०० धावावर नाबाद राहिले. तसेच ऑस्ट्रेलिया मार्नस लाबुशेन चे पहिल्या डावात २०४ धावा केल्या आणि त्यांच्या दुसऱ्या डावात १०४ धावा वर नाबाद राहिले.
सुनील गावस्कर पहले भारतीय एकमेव खेळाडू आहे ज्यांनी एकाच सामन्यात शतक आणि नंतर द्विशतक केले आहे. सुनील गावस्कर नंतर शुभमन गिल ने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक केले. गिल हा एकाच कसोटीत २५०+ आणि १५०+ धावा करणारा पहिला खेळाडू आहे.
खेळाडू | प्रतिस्पर्धी आणि स्थळ | पहिला डाव | दुसरा डाव |
डग वॉल्टर्स (ऑस्ट्रेलिया) | विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, १९६९ | २४२ | १०३ |
सुनील गावस्कर (भारत) | विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, १९७१ | १२४ | २२० |
लॉरेन्स रो (वेस्ट इंडिज) | विरुद्ध न्यूझीलंड, किंग्स्टन, १९७२ | २१४ | १००* |
ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया) | विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, १९७४ | २४७* | १३३ |
ग्राहम गूच (इंग्लंड) | विरुद्ध भारत, लॉर्ड्स, १९९० | ३३३ | १२३ |
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) | विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, २००१ | २२१ | १३० |
कुमार संगकारा (श्रीलंका) | विरुद्ध बांगलादेश, चॅटोग्राम, २०१४ | ३१९ | १०५ |
मार्नस लाबुशेन (ऑस्ट्रेलिया) | विरुद्ध वेस्ट इंडिज, पर्थ, २०२२ | २०४ | १०४* |
शुभमन गिल (भारत) | विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५ | २६९ | १६१ |

जागतिक कसोटी इतिहासात एकाच कसोटी सामन्यात सर्वात जास्त वैयक्तिक धावा करणारे फलंदाज:
१. ग्रॅहम गूच (इंग्लंड) – ४५६ विरुद्ध भारत (१९९०)
२. शुभमन गिल (इंडिया) – ४३० विरुद्ध इंग्लंड (२०२५)
३. मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया) – ४२६ विरुद्ध पाकिस्तान (१९९८)
४. कुमार संगकारा (श्रीलंका) – ४२४ विरुद्ध बांगलादेश (२०१४)
५. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – ४०० विरुद्ध इंग्लंड (२००४). वेशेष म्हणजे एकाच डावात ४०० धावा केल्या होत्या.