भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना २०२५ बर्मिंगहॅम येथे – सामन्याचा सारांश, स्कोअरकार्ड, शतकवीर आणि निकाल
India vs England 2nd Test Match 2025 at Birmingham – Match Summary, Scorecard, Centuries and Result
Written by : K. B.
Updated : जुलै 22, 2025 | 12:05 AM
भारत विरुद्ध इंग्लंड मॅच डिटेल्स :
सीरीज | भारताचा इंग्लंड दौरा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप |
सीजन | 2025 |
मॅच | भारत विरुद्ध इंग्लंड |
स्थळ | एजबॅस्टन, बर्मिंगहॅम |
सामन्याची तारीख / वेळ | २-६ जुलै २०२५ ३.३०pm. |
नाणेफेक | इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. |
थेट प्रक्षेपण | जिओ हॉटस्टार, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क |
निकाल | भारत ३३६ धावांनी जिंकला |
सामनावीर | शुभमन गिल |
मॅच हायलाइट्स :
भारताने एजबॅस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३३६ धावांनी हरवून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसह १-१ अशी बरोबरी साधली. विजयासाठी अशक्य ६०८ धावांचा टप्पा गाठल्यानंतर, इंग्लंडचा एकूण धावसंख्या २७१ झाली, आकाश दीपची दहा विकेटची झुंज आणि मोहम्मद सिराजची सुरुवातीची खेळी महत्त्वाची ठरली. शुभमन गिलच्या कर्णधारपदाला एकूण ४३० धावा (२६९ आणि १६१) करून मोठी कामगिरी बजावली, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

दिवस १ (२ जुलै)
इंग्लंड ने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल (८७) धावा करून बाद झाला. (शुभमन गिल ११४, रवींद्र जडेजा ४१) वर होते. शुभमन गिल ने १९९ चेंडूत १०० (११ x ४) धावा केल्या. भारताने पहिल्या दिवसाचा शेवट ८५ ओव्हर्स मध्ये ३१० धावा ५ विकेट्स गमावून चांगल्या स्थितीत केला.
दिवस २ (३ जुलै)
गिलने २६९ धावा केल्या आणि दुपारी उशिरा बाद झाला. जडेजाने गिलच्या मॅरेथॉन खेळीला ८९ धावांची साथ दिली. इंग्लंड ने भारताला ५८७ धावांवर सर्वबाद केले. इंग्लंडने दिवसाची सुरुवात ३३ धावांवर ३ विकेट्स गेल्या. दिवसाअखेर इंग्लंड ७७/३ वर ज्यामध्ये जो रूटचे १८ आणि हॅरी ब्रूकचे ३० धावा होत्या.
दिवस ३ (४ जुलै)
हॅरी ब्रूक (१५८) आणि जेमी स्मिथ (१८४*) यांनी इंग्लंडच्या फलंदाजीचे नेतृत्व केले आणि त्यांनी एकूण ३०३ धावा केल्या. मोहम्मद सिराजने सुरुवातीला ७० धावांत ६ बळी घेतले, भारताने इंग्लंड ला ४०७ धावांवर सर्वबाद केले. भारताचे दुसऱ्या डावात सुरुवात झाली. दिवसाअखेर १३ ओव्हर्स मध्ये ६४/१ अशी होती. त्यामधेय के एल राहुल चे २८ धावा आणि करून नायर चे ७ धाव होत्या.
दिवस ४ (५ जुलै)
भारताने खेळ सुरू केला आणि गिलच्या १६१ आणि जडेजाच्या नाबाद ६९ धावांच्या मदतीने ४२७/६ धावा केल्या. सर्वात जास्त लक्ष्य ६०८ धावांचे ठेवण्यात आले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आकाश दीप (४/८८) आणि सिराज १ यांनी इंग्लंडचा डाव ७२/३ असा कमी केला.
दिवस ५ (६ जुलै)
इंग्लंडचा शेवटचा स्टँड जेमी स्मिथ (८८) होता, परंतु दीपच्या वेगवान गोलंदाजीने तो बाद झाला. आकाश दीपने ६ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव २७१ धावांवर संपला, ज्यामुळे भारताला ३३६ धावांनी विजय मिळाला आणि मालिका बरोबरीत आली.
सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
शुभमन गिल (भारत) ने पहिला डावात २६९ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात १६१ धाव केल्या. एकूण ४३० धावा केल्या.
जेमी स्मिथ (इंग्लंड) ने पहिला डावात नाबाद १८४ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ८८ धाव केल्या. एकूण २७२ धावा केल्या.
हॅरी ब्रूक (इंग्लंड) ने पहिला डावात १५८ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ८८ धाव केल्या. एकूण २७२ धावा केल्या.
रवींद्र जडेजा (भारत) ने पहिला डावात ८९* धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ६९* धाव केल्या. एकूण १५८ धावा केल्या.
सर्वाधिक विकेट घेणारे
गोलंदाज संघ पहिला डाव दुसरा डाव एकूण विकेट
आकाश दीप (इंडिया) ने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स अशा एकूण १० विकेट्स घेतल्या.
मोहम्मद सिराज (इंडिया) ने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १ विकेट्स अशा एकूण ७ विकेट्स घेतल्या.
शोएब बशीर (इंग्लंड) ने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या, एकूण ५ विकेट्स घेतल्या.
निकाल: ५ सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरी.