न्यूझीलंड इंडिया टूर 2024: न्यूझीलंडने कसोटी इतिहासात प्रथमच घरच्या मैदानावर भारताचा 3-0 असा पराभव केला.
न्यूझीलंड इंडिया टूर 2024: न्यूझीलंडने कसोटी इतिहासात प्रथमच घरच्या मैदानावर भारताचा 3-0 असा पराभव केला | New Zealand India Tour 2024: New Zealand beat India 3-0 for the first time at home in Test History
Written by : K. B.
Updated : नोव्हेंबर 3, 2024 | 04:06 PM
न्यूझीलंडचा भारत दौरा 2024: सामन्यांचे तपशील आणि ठळक मुद्दे पाहू:
न्यूझीलंड क्रिकेट संघाने 2024 मध्ये भारताच्या रोमांचक दौऱ्याला सुरुवात केली, ज्यामध्ये रोमहर्षक सामन्यांची मालिका होती ज्याने चाहत्यांना त्यांच्या सीटच्या काठावर ठेवले होते. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश होता, ज्यामुळे दोन्ही संघांना त्यांचे कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले.
पहिली कसोटी: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू (ऑक्टोबर 16-20, 2024)
भारताने नाणेफेक जिंकून फर्स्ट इनिंग्स मध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फक्त ४६ रन्स मध्ये न्यूझीलंड ने भारतीय खेळाडूंना सर्वांना बाद केले. त्यात हेन्री 5 विकेट्स, विल्यम ओरुरके 4 विकेट्स आणि साउथी 1 विकेट्स घेऊन ऑलआऊट केले. हि टीम भारताकडून निराशाजनक खेळपट्टी होती. न्यूझीलंडने 91.3 षटकात 10 विकेट गमावत 402 धावा केल्या, आर. रवींद्रने 157 चेंडूत 134 धावा करून शतकाची चमक दाखवली.
दुसऱ्या इनिंग मध्ये भारताने 99.3 षटकात ४६२ धावा केल्या. त्यामध्ये रोहित शर्मा 50(63), विराट कोहली 70 (102), सर्फराज ने 150 (195), रिषभ पंत 99 (105) फक्त 1 रन्स ने शतक हुकले.
दुसऱ्या इनिंग मध्ये न्यूझीलंडने 27.3 षटकात 2 विकेट गमावत 110 धावा केल्या. न्यूझीलंडने 8 विकेट्स राखून लक्ष्याचा पाठलाग केला. पहिली टेस्ट न्यूझीलंड ने 8 विकेट्सने जिंकली. आर. रवींद्रला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
दुसरी कसोटी: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे (ऑक्टोबर 24-28, 2024)
फर्स्ट इनिंग मध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 79.1 षटकात 10 विकेट गमावत 259 धावा केल्या. भारतीय गोलंदाज आर. अश्विन 3 विकेट्स आणि वॉशिंग्टन ने 7 विकेट्स घेतल्या. भारताने आपल्या पहिल्या डावात 45.3 षटकात 10 विकेट्सवर केवळ 156 धावा करता आल्या. न्यूझीलंड गोलंदाज साऊथी 1 विकेट्स, एम. सँटनर 7 विकेट्स, ग्लेन फिलिप्स 2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने त्यांचा दुसरा डाव 69.4 षटकांत 10 गडी गमावून 255 धावांवर घोषित केला. भारताने त्यांच्या दुसऱ्या डावात 60.2 षटकात 10 विकेट गमावत 245 धावा केल्या, परिणामी न्यूझीलंडने 113 धावांनी सामना जिंकला. एम. सँटनरला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी, 33 धावा आणि 7 विकेट घेतल्याबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
तिसरी कसोटी: वानखेडे स्टेडियम, मुंबई (30 ऑक्टोबर – 5 नोव्हेंबर 2024)
मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सध्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होता. पहिल्या डावात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 65.4 षटकात 10 गडी गमावून 235 धावा केल्या. भारतीय गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर 4 विकेट्स, रवींद्र जडेजा 5 विकेट्स आकाश दीप 1 विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात 59.4 षटकात 10 विकेट गमावत 263 धावा केल्या. न्यूझीलंड चे गोलंदाज मॅट हेन्री 1 विकेट्स, एजाज पटेल 5 विकेट्स, ग्लेन फिलिप्स 1 विकेट्स, इश सोधी 1 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 45.5 षटकात 10 गडी गमावून 174 धावा केल्या. भारतीय गोलंदाज आकाश दीप 1 विकेट्स, वॉशिंग्टन सुंदर 1 विकेट्स, अश्विन 3 विकेट्स, रवींद्र जडेजा 5 विकेट्स घेतल्या. भारताने त्यांच्या दुसऱ्या डावात 29.1 षटकात 10 विकेट गमावत 121 धावा केल्या. तिसरी टेस्ट न्यूझीलंड ने 25 धावांनी जिंकली. न्यूझीलंड एजाज पटेल ला सामनावीर घोषित केले.
कसोटी रिजल्ट: न्यूझीलंडने 3 सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली.
मॅन ऑफ द सीरिज: मॅन ऑफ द सीरिज चा सन्मान न्यूझीलंड च्या विल यंग ला देण्यात आला.